Mumbai : मुंबईतील झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांची छापेमारी; कोट्यवधींची लूट

मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात छापे टाकून करोडोची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर 4 अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वतःला इडिचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले. सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply