Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्या निमित्त मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त...

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. नरेंद्र मोदींचा संपूर्ण मुंबई दौरा व्यवस्थित पार पडावा म्हणून पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवला आहे.

या संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच वाहतुकीचेही नियमन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच 5 पोलीस उपायुक्त यावेळी या परिसरात हजर असतील. त्यांच्या मदतीला 27 एसीपी 171 पोलीस निरीक्षक आणि 397 इतर अधिकारी हजर असतील. तर या संपूर्ण परिसरात बंदोबस्ताकरिता तब्बल अडीच हजार पोलीस अंमलदार असतील.

त्यात 600 महिला पोलीसही असणार आहे. तसेच, या सगळ्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी तसेच शीघ्र कृती दलदेखील हजर असेल. स्वतः मुंबई पोलीस आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवणार असून त्यांच्या जोडीला स्पेशल सीपी आणि इतर पोलीस आयुक्त असणार आहेत. या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply