Mumbai | आदित्य ठाकरे शिवाजी पार्कत दाखल, राज ठाकरे करणार परिसराची पाहाणी

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे इथल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत, तसेच परिसरातील विविध समस्या समजून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित आहेत. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि परिसरातील नेमक्या अडचणींबाबत माहिती गोळा केली होती. त्यानंतर आज मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे स्वतः परिसराची पाहणी करणार आहेत आणि नागरिकांच्या समस्या थेट पाहून त्यांचा आढावा घेणार आहेत. आदित्य ठाकरेच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधला जात असून काही लोकप्रतिनिधी व अधिकारी देखील याठीकाणी उपस्थित आहेत. या भेटीदरम्यान परिसरातील समस्या, उपाययोजना आणि विकासाबाबत चर्चा केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *