Mumbai : जापानी नौदलाची जे एस माकीनामी युद्धनौका मुंबईत दाखल

मुंबई - जपानी नौदलाची युद्धनौका जे एस माकिनामीने मुंबईत पोहोचली आहे. जे एस माकिनामी युद्धनौका 18-20 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत भारतीय नौदलाच्या सदिच्छा भेटीसाठी आली आहे.

युद्धनौका जेएस माकिनामी, एक ताकानामी वर्गाची घटक विनाशकारी युद्धनौका आहे. जे एस माकिनामी युद्धनौका मनामा, बहरीन येथे जात आहे. ताचे एडनच्या आखातात तस्करी विरोधी ऑपरेशन्ससाठी तैनात केले जात आहे.

जे एस माकिनामी युद्धनौकेचे कॅप्टन फुजी केनरिची, कमांडर नोज कोजी, कॅप्टन ताचिबाना हिरोशी यांनी भारतीय नौदलाचे रिअर अॅडमिरल कुणाल सिंग राजकुमार यांची भेट घेतली. वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई आणि सामायिक आघाडीच्या विषयांवर भेटीत चर्चा केली.

भारत आणि जपान त्यांच्या नौदलांमध्ये नियमितपणे युद्धाभ्यास सराव करतात. 2015 पासून, जपान देखील नौदल युद्धाभ्यास सरावांच्या ‘मलबार’ या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

ज्यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. जपानमधील शिगा प्रांतातील कॅम्प इमाझू येथे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये 17 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ‘धर्म संरक्षक’ हा सरावही सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply