
Mumbai : मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या पिलरमधील सिमेंटचा भाग उंचावरुन खाली कोसळल्याने दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड येथे पिलरचा भाग एका रिक्षावर कोसळून तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. मेट्रोचा पिलर खाली कोसळून झालेल्या अपघातानंतरचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मुलुंड येथे मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग कोसळला. शनिवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या जवळ मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असताना हा प्रकार घडला.
कसा झाला अपघात?
एलबीएस मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान सिमेंटच्या खांबाचा एक भाग कोसळून खालून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यावेळी रिक्षातून प्रवास करणारे चालकासह तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
रिक्षा पिलरखाली दबल्यामुळे एक जण काही काळ अडकून पडला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने स्लॅब हटवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळालं.
मेट्रो मार्ग चारवर अपघात
मुंबई मेट्रो 4 या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मार्गे जाणाऱ्या ग्रीन लाइनवरील स्टेशनच्या बांधकामावेळी हा अपघात झाला आहे. 32.32 किमीचा एलिवेटेड कॉरिडोअर मुलुंडसह भांडुप, कांजुरमार्ग या एलबीएस रोडवरील स्थानकांची कनेक्टिव्हिटी वाढवत मुंबईतील महत्वपूर्ण व्यावसायिक भागांशी जोडेल. यामुळे मुंबई लोकलवरील ताण कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ ६०-७५ मिनिटांवरून ३०-४० मिनिटांपर्यंत कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

