Mumbai : ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला...भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Mulund Car And Bike Accident: मुंबईमध्ये कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंलुडमध्ये ही घटना घडली आहे. या अपघाताप्रकरणी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. मुलुंडमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 75 वर्षीय तुकाराम सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. मुलुंड पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच २२ वर्षीय अमरीश यादव या तरुणाला अटक केली आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम २७९, ३०४(अ), ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Jalna Car Accident : हृदयद्रावक! देवदर्शनावरुन परतताना काळाचा घाला, अपघातानंतर कारला भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला आहे. वांद्रे येथे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन वाहन पलटी झाली. अपघातात वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या गाडीचा देखील समावेश आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. दोन्ही कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पावसामुळे चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वाहन चालकांचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे किंवा गाड्यांमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मुंबईमध्ये पुढचे तीन ते चार तास महत्वाचे असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply