Mukhyamantri Sahayata Nidhi : फडणवीसांचा शिंदेंना धक्का; चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुखपदी नियुक्ती

Mukhyamantri Sahayata Nidhi : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. एक महत्त्वाचा बदल म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी डॉ. रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आलीय. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख होते. रामेश्वर नाईक हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे विश्वासू समजले जातात.

डॉ. रामेश्वर नाईक यांनी कला शाखेतील पदवीचं शिक्षण घेतलंय. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवीचं शिक्षण केलंय. नाईक यांनी २०१४ साली वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून काम केलं होतं. यानंतरच्या काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणूनही काम पाहिलंय. तसेच जुलै २०२१ मध्ये रामेश्वर नाईक यांची वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Parbhani : परभणी बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानं, वाहनांवर दगडफेक; जाळपोळ

ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुखपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात डॉ. रामेश्वर नाईकांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. रामेश्वर नाईक यांनी विविध पदांवर काम करताना राज्यात अनेक ठिकाणी 115 वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रोसी, डायबेटिसच्या हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात येते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर या कक्षाची स्थापना केली होती. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं काम प्रभावीपणे झालं. त्याचा सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी फायदा होतो याची प्रचिती त्यातून झाली. मंगेश चिवटेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच चिवटे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी त्यावेळी अनेक गरजू लोकांना मदत केली होती. ते आरोग्यदूत म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा चिवटे यांची निवड करण्यात आली होती. चिवटे यांचा प्रामाणिकपणा पाहून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असतना चिवटे यांच्यावर विश्वास टाकत मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply