MSRTC Recruitment : एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

MSRTC Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळामध्ये लवकरच मेगाभरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. यासंदर्भातील अधिकृत सूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी बेस्ट बसच्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली होती. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ही भाडेवाढ ८ मे पासून लागू करण्यात आली असून, आता एसटी महामंडळाने मेगाभरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेगाभरतीसह गाड्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Whatsapp : वर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील रिक्त पदांमुळे सेवा व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरच चालक, वाहक, यांत्रिकी, लिपिक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची अधिकृत सूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply