MSRTC Bus Fire : अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी बस पेटली; 35 प्रवासी थोडक्यात बचावले

अमरावती : पुण्यात येरवडा येथे आज, मंगळवारी बसला भीषण आग लागलेली असतानाच, आता अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला आग लागली. या भीषण दुर्घटनेतून ३५ प्रवासी थोडक्यात बचावले. महामार्गावरच बस पेटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील तासाभरापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमरावती शहरापासून २० किलोमीटर दूर पिंपळविहीर गावाजवळ एसटी बसला अचानक आग लागली. ही एसटी ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. या एसटी बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने बसमधील ३५ प्रवासांचे प्राण वाचले. नागपूर आगाराची ही एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती.

दरम्यान, चालत्या एसटी बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरली. त्यानंतर पाहता पाहता एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली. एसटी बसा आग लागल्याने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. तर अग्निशामक दलाने तासाभरानंतर एसटी बसला लागलेली आग विझविण्यात त्यांना यश आले. घटनेनंतर तासाभरानंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत झाली आहे .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply