Msedcl Contractual Workers Strike : कल्याणमध्ये वीज कंत्राटी कामगारांची एकजूट, बेमुदत काम बंद आंदोलनास प्रारंभ

Msedcl Contractual Workers Strike : कल्याण शहरातील महावितरणच्या कार्यालया बाहेर वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी सरकारला दिला आहे. 

कंत्राटी कामगारांच्या वेतनात 30 टक्के वाढ ,रोजनदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार योजना, भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना सामावून घेणे त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया करावी या प्रमुख मागण्यांसाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी कल्याण येथील महावितरण कार्यालया बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Pune Crime : उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या, पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

कंत्राटी कामगारांना सरकारकडून वारंवार आश्वासन दिली जातात मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाहीत, ठोस निर्णय घेतला जात नाही या निषेधार्थ महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने मनोज भानुशाली यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. 

दरम्यान कंत्राटी कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे महावितरणचे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून सरकार याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply