MPSC Combine Exam : हॉल तिकीट व्हायरल झाल्याप्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईः एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचे हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी आता नवी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला.

30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब', 'क'च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती आहे.

तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. एका टेलिग्राम चॅनलवर 30 एप्रिलला होणार्‍या परीक्षेचा डाटा लीक झाल्याची माहिती मिळाली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *