MP Supriya Sule ‘उर्फी व चित्रा वाघ’ यांच्यातील प्रकरण; गलिच्छ राजकारण थांबवाव

खडकवासला - अभिनेत्री उर्फी जावेद व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील आरोप- प्रत्यारोप वाढत असून ते थांबले पाहीजेत. ते थांबविण्याची सुरवात आम्ही आमच्यापासून पक्षापासून करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी करीत हे गलिच्छ राजकारण थांबवाव अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘वेध भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा' आयोजित एकदिवसीय शिबिर आयोजित केले होते. खासदार सुळे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. शिबिरानंतर माध्यमांशी बोलत होत्या.

विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फी जावेद हिच्यावरून सध्या राज्यात महिला नेत्यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी हे उत्तर दिलं. गेली अनेक आठवडे राज्यभर संधी मिळेल तिथे मी हेच सांगतेय हे थांबवा. ‘माझी सर्व पक्षांना विनंती आहे. हे आरोप- प्रत्यारोप थांबले पाहीजेत. अनेक पक्षांच्या नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. अनेक महिन्यांपासून मी पाहत आहे.

महिलांना मातेसन्मान जिथे होते तिथे हे घडतंय. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. मूलांसोबत कशा बातम्या बघायच्या. हे महाराष्ट्राचं जनरल नॅालेज आहे का ? असा सवाल देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply