MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Maihar Road Accident: मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने प्रयागराजहून नागपूरला जाणारी बस रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर २१ जण जखमी झालेत. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की जेसीबीच्या कटरने पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही बस प्रयागराजहून नागपूरला जात होती. मैहर जिल्ह्यातील नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला बसने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झालेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gujrat Road Accident : मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

घटनेची माहिती मिळताच मैहर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीने मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या मृतांचे मृतदेह जेसीबी कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भितीही पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply