
Weather Update : देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील शिमल्यात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसानंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येही पाणी साचलं आहे.
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
सलग दोन दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झालंय तर काही ठिकाणी पाणी साचलं आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबईत शनिवारीच मान्सूनने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अधिकारी सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. 25 जूनपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. यादरम्यान दोन इमारतीही कोसळल्या, त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
मैदानी भागात जोरदार पाऊस
राजधानी दिल्लीत अनेक भागात रविवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात पावसानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, कुरुक्षेत्र आणि मोहालीच्या अनेक भागात पाऊस झाला. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस पडला
कुठे ढगफुटी, तर कुठे भूस्खलन
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. हिमालचमधील सोलन आमि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यामे पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली. शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये जोरदाप पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झालं आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस
हरिद्वारमध्येही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. कोणतीही जीवितहानी समोर आलेली नाही. शहरातील अनेक भागांतून पाणी तुंबण्याची समस्या समोर आली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. उत्तराखंडच्या डेहराडून आणि ऋषिकेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.
हिमाचल प्रदेशात ढगफुटी
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. शिमल्याच्या रामपूर तालुक्यातील सरपारा गावात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालं आहे. कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे मोहल खड्यात अचानक पूर आला आणि अनेक वाहनांचं नुकसान झालं. जेसीबीच्या साहाय्याने नुकसान झालेली वाहने बाहेर काढण्यात आली आहेत.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

