Monsoon in Mumbai : मान्सूनबाबत जुळून आला अनोखा योगायोग; तब्बल ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

Monsoon In Mumbai Coincidence: गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर सुरू झाला आहे. रविवारी मान्सूनने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. उत्तर भारतातही मान्सूनने चांगलाच जोर पकडला असून अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, मान्सूनबाबत अनोखा योगायोग जुळून आला असून तब्बल ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी मान्सून दाखल झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हवामान खात्याच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

मान्सूनबाबत जुळून आला अनोखा योगायोग

साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या १५ दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत १० ते १५ जूनदरम्यान मान्सूनच्या  पावसाला सुरूवात होते. तर दिल्लीत सामान्यपणे ३० जूनला पाऊस हजेरी लावतो. अशा स्थितीत एकीकडे मुंबईत पाऊस दोन आठवडे उशीरा दाखल झाला असताना, दुसरीकडे दिल्लीत मात्र, ५ दिवस आधीच कोसळला आहे.

यापूर्वी २१ जून १९६१ साली मुंबईआणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला होता. दोन्ही शहरांमध्ये पावसाने धुव्वाधार बँटिंग केली होती. त्यानंतर तब्बल ६२ वर्षांनी म्हणजेच २५ जून २०२३ रोजी हा योगायोग जुळून आला असून मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, शनिवारी (२४ जून) दुपारपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. रविवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply