Money Laundering Case : अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांचा मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. 

ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती. मात्र, आज, सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

१०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. कलम ८८ सीआरपीसी अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ऋषिकेश देशमुख यांना तीन लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *