MNS Raj Thackeray News : राज ठाकरे रणांगणात उतरले! मनसे घेणार लोकसभेच्या २२ जागांचा आढावा; ठाकरे गटाने डिवचलं

MNS Raj Thackeray News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. पक्षबांधणी, मतदारसंघांचा आढावा सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे. मात्र एकीकडे राज्यात आघाडी, युतीचं राजकारण सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या ते 'एकला चलो रे'च्या भूमिकेत आहेत.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात न उतरलेल्या राज ठाकरेंच्या मनसेने यावेळी तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी देखील मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  

NIA Raid In Pune And Amravati : एनआयएची पुणे, अमरावतीत छापेमारी; शिक्षकाच्या मुलासह दोन तरूण ताब्यात

यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाची महत्त्वाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील MIG येथे ही लोकसभा आढावा बैठक पार पडत आहे. बैठकीला मनसेचे राज्यभरातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

संजय राऊतांची टीका

राज ठाकरे यांच्या भूमिका न घेण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांना भाजपला मदत करायची आहे. देश वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची ही वेळ आहे. सगळ्यांनी एकत्र येत लोकशाहीची मदत करावी अशा मताचे आम्ही आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांनी तरी शहानपणाची भूमिका घ्यावी. हुकुमशाही विरुद्ध लढण्याची तुमची तयारी किती आहे हे सांगितल पाहिजे. सातत्याने भूमिका बदलणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर त्यांनी ठाम भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्याकडे आम्ही आशेने पाहून शकतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply