MNS Protest against Jitendra Awhad : श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना मनसे धडा शिकवणार, जितेंद्र आव्हाडांवर अंधेरीत गुन्हा दाखल

MNS Protest against Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कल्याण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने निषेध नाेंदविण्यात आला. दरम्यान मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर श्रीरामांबाबतच्या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.

प्रभु श्रीरामांबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात विविध हिंदुत्ववादी संघटना आजही (शनिवार) आव्हाडांचा निषेध नाेंदवित आहेत. कल्याण येथे मनसे कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी अंकूश राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील काही सरकारी शौचालयात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो लावला.

Indian Navy Rescue Hijacked Ship : भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या जहाजाची केली सुटका

येत्या 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांना दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी साम टीव्हीशी बाेलताना उपस्थित केला.

जो कोणी श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करेल त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply