MNS Padwa Melava : शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा; वाहतुकीत मोठे बदल

MNS Padwa Melava : येत्या ९ एप्रिलला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने देखील परवानगी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर २ दिवसांपूर्वीच पोस्ट केला होता. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

दरवर्षी पाडव्याला अनेक मनसे समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. येथे पोहचत असताना रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर देखील वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Maharashtra Weather Forecast : उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

या सर्वांत नागरिकांना प्रवास करताना कोणतीही गैरसोय होऊनये म्हणून मुंबई पोलिसांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. एसव्हीएस रोड सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँकेपर्यंत पार्किंग करता येणार नाही. यासह केळुस्कर रोड (दक्षिण आणि (उत्तर) दादर, एम.बी. राऊत रोड (एस वी एस रोडच्या जंक्शनपासून), दादर, पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड) दादर, पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड) दादर या रस्त्यांवर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

तसेच दादासाहेब रेगे मार्ग सेनापती बापट पुतळ्यापासून गडकरी जंक्शनपर्यंत, लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शितलादेवी मंदिर जंक्शन पर्यंत, एन.सी. केळकर मार्ग गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन पर्यंत देखील पार्किंगची सोय नसणारे.

येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्थेत सेनापती बापट मार्ग, माहीम आणि दादर, कामगार स्टेडियम सेनापती बापट मार्ग, इंडिया बुल फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, एल्फिन्स्टन, कोहिनूर पीपीएल पार्किंग, शिवाजीपार्क, अप्पासाहेब मराठे मार्ग, फाइव्ह गार्डन्स परिमिती, माटुंगा, वाळूचे माकड माहीम, आर.ए.के. चार रस्ता येथी आपली वाहने पार्क करता येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply