MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी घडामोडींना वेग! विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. येत्या एक ते दोन दिवसात ठाकरे आणि शिंदे गटाला राहुल नार्वेकर यांच्याकडून नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला येत्या दोन दिवसात नोटीस पाठवली जाणार आहे. अशातच आज राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Cm Eknath Shinde: सरकारी योजना आणि निर्णयांची माहिती मिळेल एका क्लिकवर! मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲपवर...

सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांपुर्वी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाने देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकर यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष लवकरच नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांना आपली बाजू एक- दोन आठवड्यामध्ये मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply