Mithi River News : मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Mumbai News : पावसाळी अधिवेशनात आज मुंबईतील मिठी नदीवर चर्चा झाली. ही चर्चा 2005 पासून 2023 पर्यंत नदीचं सौंदर्य आणि नदीतील गाळ काढण्यासाठी किती खर्च झाला, यावर झाली. या चर्चनंतर या नदीतील गाळ काढण्यावर किती खर्च झाला, याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. 

मिठी नदीतील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोापारवरून विरोधक आणि सत्तांधाऱ्यांमध्ये सभागृहात एकच खडाजंगी झाली. विरोधकांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. संबंधित काम मुंबई महानगर पालिका आणि एमएमआरडीए यांच्याकडे होतं.

दरम्यान, मिठी नदी रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणावरून अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात खडाजंगी झाल्याचं सभागृहात पाहायला मिळालं. मंत्री सभागृहात खोटी माहिती देत आहेत. खोटी माहिती घेऊन मंत्री सभागृहात येतात, असं म्हणत अनिल परब यांनी उदय सामंत यांना डिवचलं.

Shirish Kanekar No More : ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यानंतर उदय सामंत म्हणाले, ‘आम्ही उत्तर देताना कोणतीही खोटी माहिती देत नाही. आम्हालाही सभागृहात चार-चार वर्षांचा अनभव आहे. आम्हालाही सभागृहात बोलण्याचा अनुभव आहे’.

दरम्यान, मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केली. तसेच वर्ष 2005 ते 2023 पर्यंत नदीचा सौंदर्यासाठी किती खर्च झाला, तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार, असं उत्तर मंत्री सामंत यांनी आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला दिलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply