Mission Artemis-II : 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा चंद्रावर जाणार! नासाने जाहीर केली अंतराळवीरांची नावं

Mission Artemis-II Astronauts Names  : आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आपल्या आर्टेमिस-II मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत. हे अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुढील वर्षीच्या सुरुवातीला पृथ्वीवर परततील. अपोलो मोहिमेच्या 50 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर माणूस पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे. हे लक्षात घ्या की आर्टेमिस-2 हे फ्लायबाय मिशन आहे.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) यांनी सोमवारी ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरजवळील एलिंग्टन फील्ड येथे एका कार्यक्रमादरम्यान आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीरांची नावं जाहीर केली. या क्रू मेंबर्समध्ये कमांडर रीड विझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, मिशन स्पेशलिस्ट 1 क्रिस्टीना हॅमॉक कोच आणि मिशन स्पेशलिस्ट 2 जेरेमी हॅन्सन या चार अंतराळवीरांचा सामावेश आहे.

नासाने पहिल्यांदाच चंद्रावरील आपल्या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून एका महिला आणि आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची निवड केली आहे. आर्टेमिस II मोहिमेचे प्रवासी चंद्रावर उतरणार नाहीत. ते केवळ त्याच्याभोवती फिरतील आणि परत येतील. आर्टेमिस मिशनद्वारे नासा चंद्रावर दीर्घकालीन उपस्थिती सुविधा स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या दशकाच्या उत्तरार्धात चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी सुविधा निर्माण करणे हे आर्टेमिस मिशनचे उद्दिष्ट आहे. 

मिशन डिसेंबर 2022 मध्ये आर्टेमिस I यशस्वीरित्या पूर्ण झाले. या मिशनमध्ये NASA च्या शक्तिशाली नेक्स्ट-जनरेशन मेगा-रॉकेट आणि त्याच्या नवीन ओरियन अंतराळयानाचे 25 दिवसांचे टेस्ट फ्लाइट पूर्ण करण्यात आले. आता आर्टेमिस II हे यान चंद्राभोवती दिवस फिरणार आहे.

या मोहिमेचा उद्देश ओरियन रॉकेटची उपकरणे आणि इतर यंत्रणा डीप स्पेसमध्ये त्यात असलेल्या अंतराळवीरांसह डिझाइन केलेली कार्ये करण्यास सक्षम आहेत हे सिद्ध करणे आहे. या मोहिमेतून 'अपोलो मिशन'च्या 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच मानव चंद्रावर जाणार आहे. अपोलो मोहिमेदरम्यान नासाने 1968 ते 1972 पर्यंत 24 अंतराळवीर चंद्रावर पाठवले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply