MiG-21 Fighter Aircraft Crashed : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली दखल

राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या मीग-२१ या लढाऊ विमानात दोन वैमानिक होते. गुरुवारी (२८ जुलै) सायंकळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. विमानात स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा शोध सुरु आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलातील मीग- २१ लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक स्वार होते. हा अपघात एवढा भीषण होता की कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे भाग अक्षरश: विखुरले आहेत. या घटनेची माहिती होताच येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या घनटेची दखल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील घेतली आहे. त्यांनी हवाई दलप्रमुख व्ही आर चौधरी यांच्याशी संवाद साधून अपघाताचे कारण तसेच इतर विचारणा केली. विमानात स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्यांचा शोध सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply