MiG-21 Crashed : राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान मिग-२१ घरावर कोसळले ! दोघांचा मृत्यू;

Rajasthan News : राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (Mig-21 Fighter Aircraft) घरावर कोसळले. राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन पायलट सुखरुप आहेत. पण रहिवासी ठिकाणी विमान कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगड येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच विमान कोसळले.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान कोसळले.

विमानामध्ये दोन पायलट होते. या दोन्ही पायलटने विमान कोसळण्यापूर्वीच उडी मारली त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. पण हे विमान घरावर कोसळल्यामुळे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. विमानाचे तुकडे गावाच्या अनेक ठिकाणी पडले असून विमान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply