MI vs KKR, IPL 2024: KKR कडून एकटा वेंकटेश लढला! स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला १७० धावांची गरज

MI vs KKR, IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर १६९ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७० धावांची गरज आहे.

पावरप्लेमध्ये मुंबईची दमदार सुरुवात..

पावरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. पावरप्लेच्या षटकात मुंबईने कोलकाताला ४ धक्के दिले. मुंबईकडून गोलंदाजी करताना नुआन तुषाराने ३ गडी बाद करत, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजीक्रमात खिंडार पाडला. तर पीयुष चावलाने १ गडी बाद केला.

Hardik Pandya Troll : हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर वेंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी केली. तर मनीष पांडे ४२ धावा करत माघारी परतला. वेंकटेश अय्यरने शानदार अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या १७० धावांवर पोहचवली. ही त्याचे या हंगामातील दुसरे अर्धशतक ठरले आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियन्स..

इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

कोलकाता नाईट रायडर्स:

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply