MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री

MHADA : मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मात्र, वाढत्या घरांच्या किमतीमुळे हे स्वप्न अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा पुन्हा एकदा लॉटरी घेऊन सज्ज झाली आहे. २०२४ मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर, आता जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. यामध्ये ठाणे, कल्याण यांसारख्या शहरांचा समावेश आहे. यामुळे हजारो इच्छुक नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुठे कुठे मिळणार घरे?

जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. यात चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या ११७३ घरांचा समावेश आहे. तर, कल्याण मध्येही म्हाडा अडीच हजार घरांची लॉटरी काढणार आहेत. त्यामुळे म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत.

Saturday Night : ला बिल्डरकडून रेव्ह पार्टी, मुंबईहून ४ तरूणीही बोलावल्या; पोलिसांकडून सिनेस्टाईल भंडाफोड

दिवाळीपूर्वी जाहीर होणार लॉटरी

२०२५ मध्ये म्हाडाकडून मुंबई मंडळात पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यात १९, ४९६ घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यापैकी मुंबईत ५,१९९ घरे बांधण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळांमध्येही घरांची बांधकामे सुरू असून, लवकरच संबंधित लॉटऱ्याही जाहीर होणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply