Mephedrone Case : मेफेड्रोन प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना २५ लाखांचे बक्षीस

 

Mephedrone Case : अमली पदार्थांबाबत पुणे पोलिसांनी केलेली कारवाई ही अलीकडच्या काळातील देशात झालेली सर्वात मोठी कारवार्इ आहे. जप्त केलेले मेफेड्रोन वापरकर्त्यांपर्यंत पोचले असते तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असती. त्यामुळे पुणे पोलिसांची कारवाई अभिनंदनास पात्र आहे, असा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.२४) पुणे पोलिसांचे कौतुक केले.

मेफेड्रोनच्या साठा जप्त करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षिसही यावेळी जाहीर करण्यात आले. पुणे पोलिसांकडून विश्रांतवाडी, कुरकुंभ, सांगली आणि दिल्ली येथे छापे टाकून मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पुण्यात तयार होत असलेल्या या अमली पदार्थांची परदेशात देखील विक्री होत होती. उत्पादनापासून वितरणाची साखळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

Goregaon Film City Incident : गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळली; २ कामगारांचा जागीच मृत्यू, एक जखमी

या पार्श्वभूमिवर फडणवीस यांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनील तांबे यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘अमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याबाबत केंद्र व राज्य सरकार आग्रही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याबाबत सर्व राज्यांतील पोलिसांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन होताना दिसत आहे. उसापासून गूळ बनविण्याचे कारखाने जसे जागा-जोगी आहेत तसेच कारखाने अमली पदार्थांच्या उत्पादनासाठी तयार होत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत आहे.’

बंदूक करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करते -

बंदुकीची गोळी जे काम करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री म्हणजे देशविरोधी गुन्हा आहे. अमली पदार्थांचे धागेदोरे जगभर पसरले आहेत. त्यामुळे वितरणाची साखळी उद्ध्वस्त केली पाहिजे. आपले पोलिस खाते हे काम निश्चितपणे करतील, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply