Melghat Water Scarcity : मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Melghat Water Scarcity : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमल गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला होता. पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून हंडा भर पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट पाहावी लागते आहे.

मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात गेल्या दोन वर्षा पासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. गावातील विहिरी संपुर्ण कोरड्या पडल्या आहेत. गावात टॅंकरने अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असून टॅंकरने पाणी गावातील विहिरीत सोडल्या जाते व तेथून ते पाणी भरण्यासाठी गावातील गरोदर महिला, मुले विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर राबत असल्याचे चित्र आहे.

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

प्रशासनाकडून पाण्याचे टँकर कमी येत आहे. प्रशासनाचे केलेले मदतीचे दावे फोल ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केला आहे.मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची दाहकता वाढत असतांना शासन- प्रशासनाद्वारा ही परीस्थिती गांर्भियाने घेतली जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथील आदिवासी बांधव करु लागले आहेत.

पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मेळघाट मध्ये राबविल्या जातात पण त्या फक्त कागदावरच. त्याचा फायदा आदिवासींना होताना दिसत नाही. जिल्ह्यात 65 गावात विहिरी अधिग्रहित केल्या असून 13 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यात पारा 44 डिग्री गेला असतांना एवढ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासीना संघर्ष करावा लागतो आहे तर दुसरीकडे राजकीय पुढारी निवडणूकीत व्यस्त आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply