Medha Market Committee Election Results : भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांच्या राजकीय खेळीस यश; 18 - 0 ने जिंकला मेढ्यातील सामना

Medha Krushi Utpanna Bazar Samiti Election Results : मेढा बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलने एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. यंदा ही निवडणुक भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत लढवली होती.

मेढा बाजार समितीचे मतदान शुक्रवारी पार पडले. यामध्ये 18 पैकी सहा जागा यापुर्वीच बिनविरोध झाल्याने 12 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणुक एकत्र लढवली. या पॅनेलच्या विरोधात महाविकास आघाडी, ठाकरे गट, राष्ट्रवादीचा दुसरा गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन लढले होते.

या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील या तिघांनी एकत्र येत मेढा बाजार समितीवर यश मिळविले. सातारा जिल्ह्याला भाजपने राष्ट्रवादीबराेबर एकत्र येत निवडणुकी लढल्याचे समीकरण पाहायला मिळाले.

राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ यांनी एकत्र येत त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. शेतक-यांनी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र केलेल्या शेतकरी विकास पॅनलला भरभरून मते दिल्याचे आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत विरोधकांना मेढा बाजार समितीत खाते सुद्धा उघडता आलेले नाही तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना आठ, एनसीपीचे आमदार मकरंद पाटील यांना पाच तसेच आमदार शशिकांत शिंदेंना पाच जागांवर विजय मिळाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply