Pavana Dam : मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला; पवना धरणात बुडून मृत्यू

Mawl : सुटीचा दिवस असल्याने मित्र- मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. पवना धरण परिसरात फिरायला गेले असताना धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला आहे. अद्ववेत सुदेश शर्मा असे तरुणाचे नाव आहे.

अद्ववेत शर्मा हा सिम्बायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान पुणे येथील पाच मित्र- मैत्रिणी पवना धरण परिसरात पर्यटनाकरिता आले होते. त्यांच्यासोबत अद्ववेत हा देखील होता. अद्ववेत धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीला आले. मात्र तो पाण्याच्या वर न आल्याने ग्रामस्थांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना फोन केला.

Ind Vs Aus Weather Update : मोठी अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार रद्द... मग कोणाला होणार फायदा? जाणून घ्या समीकरण

तीन तासांनी काढले बाहेर

सदर घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. पोलिसांनी लगेच शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा यांना प्राचारण केले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह पवना धरणातून बाहेर काढला. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply