Maval News : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! गर्भपात करताना महिलेचा मृत्यू, मृतदेहासह २ मुलांना इंद्रायणी नदीत जिवंत फेकले

 

Maval News : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी मावळमधून समोर आली आहे. गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला. या महिलेच्या दोन मुलांना देखील नदीमध्ये जिवंत फेकून देण्यात आले. या तिघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले आहे. मावळमध्ये अनैतिक संबंधातून एक महिला गरोदर राहिली. या महिलेचा गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतेदह थेट मावळमधील इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्यात आला. या घटनेमुळे मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Ravikant Tupkar News : ब्रेकिंग! रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'तून हकालपट्टी; शिस्तभंग समितीची कारवाई

महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकून देत असताना तिच्या दोन लहान मुलांनी जोरजोरात रडायला सुरूवात केली. त्यामुळे आरोपींनी या दोन्ही चिमुकल्यांना देखील इंद्रायणी नदीमध्ये जिवंत फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस तिघांचा देखील शोध घेत आहे.

याप्रकरणी आंबी एमआयडीसी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीच्या साथीदाराच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणाचा अधीक तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply