Ajit Pawar: वर्षाच्या आत शेतकर्यांना आठही दिवस दिवसा वीज देणार; अजित पवारांचा दावा

Marathwada News : महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणताना सर्व समाजघटकांचा विकास साधला आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी काळात वर्षभराच्या आत आठही दिवस दिवसा वीज पुरवठा सुरु करणार असल्याचे सांगून सोलारच्या कामाला आदेश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी पाच वाजता जनसन्मान यात्रा वसमत येथे पोहचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिंतूर टी पॉइंट ते सभेच्या ठिकाणापर्यंत मोटारसायकल रैली काढून जल्लोषात स्वागत केले. या वेळी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार राजु भैय्या नवघरे, आमदार विक्रम काळे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.

Leopard Attack : वरवंड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ, हल्यात चार मेंढ्या ठार

 

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजु नवघरे याच्या सामाजिक व विकासात्मक कामाची प्रशमा करुन या वेळी आमदार करा महाराष्ट्रात सन्मानाचं पद देऊत असे म्हणुन वसमत मतदारसंघाला मंत्रीपदाचे संकेत दिले. तसेच शेतकर्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, जगात उत्पादीत होणाऱ्या हाळदीपैकी ४० टक्के वाटा महाराष्ट्राचा असून त्यात वसमत मतदारसंघाचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने ४४ लाख शेतकर्यांचे १४९०० कोटी रुपयांचे वीज बील राज्य सरकार महावितरणला भरणार आहे. तसेच राज्यातील सर्व शेतकय्रांना वर्षभराच्या आत आठवड्यातील आठही दिवस दिवसा वीज पुरवठा करणार असून सोलारच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी महाराष्ट्रातील शेतकर्यांना साडेआठ लाख सौरऊर्जा पंप देणार असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. गोरगरीब सर्व समाज घटकातील महिलांसाठी आम्ही लाडकी बहिण योजना आणली. विरोधक मात्र टिका
करताना निवडणुकीनंतर तुमचे दिलेले पैसे काढून घेतले जाणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत. याचा समाचार घेताना कोणीही माईचा लाल तुमचा तुमचा एकही रुपया काढून घेणार नाही हा दादांचा शब्द असल्याचे ते म्हणाले.
या वेळी अजितदादा पवार याचे भाषण सुरु असतानाच सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक होत व्यासपीठावर जाऊन अजित पवार यांना मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण देण्याची मागणी करीत घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांना मध्यस्थी करुन आंदोलकांना बाहेर काढावे लागले. सभेला वसमत मतदारसंघातील हजारोंच्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता. प्रस्ताविक आमदार राजु नवघरे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा रमेश मानवते यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply