Maratha Reservation : मराठा आरक्षण पदयात्रा आज पुण्यात धडकणार; पोलिसांनी वाहतुकीचे मार्गच बदलले

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. आज मराठा पदयात्रेचा चौथा दिवस असून पदयात्रा पुणे शहरात धडकणार आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहे. 

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहे. वाहनचालकांनी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन देखील वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे आज नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Pune News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर; खाणीतील पाण्यात बुडुन दोन १२ वर्षांच्या मुलांचा मृत्यू, वाघोलीत घटना

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे ३ वाजेनंतर हळू हळू वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे.

त्याचबरोबर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक ही थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. तर ही वाहतूक तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात आली आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply