Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं; CM एकनाथ शिंदेंचे आवाहन

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेसह भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघालं आहे. लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्यानुसार कुणबी दाखले देण्याचं काम वेगाने सुरु आहे. हजारो-लाखो लोकांना कुणबी नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधून त्यांना कुणबी दाखले दिले जात आहेत. 

Aditya Thackeray : 'भाजपने २ पक्ष फोडले, खोके सरकार डोक्यावर बसवलं..' पिंपरीच्या सभेत आदित्य ठाकरे बरसले

तेलंगणा, हैदराबाद येथे जुनी दस्तावेज आहेत, ती तपासली जात आहे. अनेक दस्तावेज उर्दू, फारसी, मोडी लिपीत आहेत, ती देखील तपासली जात आहेत. तेथे अनेक तज्ज्ञांचा नेमणूक केली आहे. ते देखील काम वेगाने सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

एकीकडे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. तर दुसरीकडे मागासवर्ग आयोग आपलं काम करत आहे. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी देखील लाखो लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. मराठा समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा केला जात आहे. अशीरितीने मराठा समाजाला टीकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सरकार कटीबद्ध आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply