Maratha Reservation: मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबई सज्ज; पनवेलमध्ये १० लाख बांधवांच्या भोजनाची व्यवस्था

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील काल मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण वितरीत केलं जाणार आहे.

Ram Mandir Inauguration : भारतातच नाही तर ब्रिटनच्या संसदेतही राममय वातावरण; गुंजला 'जय श्री राम' नारा,

मनोज जरांगे पाटलांच्या मुक्कामाची तयारी

लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या वाकसई गावातील दोनशे एकर मैदानावर आजपासून तयारी सुरू करण्यात येत आहे. तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने मैदान सपाटीकरणाचं काम सुरू केलं आहे. तर सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची सोय ही मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रत्येक मराठा कुटुंब करणार आहे.

पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मातोरी प्रवास केला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला मातोरी ते करंजी बाराबाभळी प्रवास करणारेत. मातोरीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम / जेवण व जेवण असेल.

तिसरा दिवस 22 जानेवारीला बाराबाभळी ते रांजणगाव प्रवास असेल. चौथ्या दिवशी २३ जानेवारी रोजी रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास. पाचव्या दिवशी २४ जानेवारी खराडी बायपास ते लोणावळा प्रवास असणार आहे. पुढे २५ तारखेला लोणावळा ते वाशी आणि २६ तारखेला वाशीते मुंबई प्रवास करत आजाद मैदान गाठणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply