Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणासाठी पालिका लागली कामाला; सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबई महानगर पालिका सज्ज झाली असून पालिकेच्या 24 विभागाच्या सहाय्य आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी अॅप येताच सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू होणार आहे.

सर्वेक्षणाच्या कामाकरिता कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे सर्वस्वी अधिकार हे सहाय्यक आयुक्तांचे असतील, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी दिले आहेत. विभागस्तरावर सुमारे १५० घरांसाठी १ प्रगणक आणि १० टक्के अतिरिक्त प्रगणक तसेच २० प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक अशा प्रमाणात कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. ज्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड शासनाकडून देण्यांत येतीत.

Manoj Jarange Patil : पंतप्रधान नाशिकला आले पण सिंदखेडराजाला आले नाहीत; मोदींवर मनोज जरांगेंची नाराजी

त्यापैकी कोणत्या कर्मचाऱ्यास प्रगणक, अतिरिक्त प्रगणक व पर्यवेक्षकाचे काम दद्यायचे आहे, याबाबतचा निर्णय विभागस्तरावर सहाय्यक आयुक्त घेणार आहेत.

सहाय्यक आयुक्तांचे नियुक्तीचे आदेश बंधनकारक राहतील. तसेच विभागस्तरावर प्रशासकीय अधिकारी इतर अधिकारी यांना मध्यवर्ती कार्यालय इतर विभाग कार्यालय शासनाचे अधिकारी आणि कर्मचा-यांसोबत समन्वयासाठी विभागस्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा अॅप हा प्रत्येक कर्मचा-याच्या मोबाईल वर असणार आहे. पालिका सर्वेक्षणासाठी सज्ज झाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply