Maratha Reservation : भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : मला गोळी मारली जाऊ शकते, भर सभागृहात छगन भुजबळांनी  खळबळजनक दावा केला. त्यावर  भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल? असा सवाल मराठा आंदोलक  केला आहे. भुजबळ विश्वासघातकी असल्याचीही टीका केली  आहे.  तर पोलिसांनीच एसआयटीला फायरिंगबाबत माहिती दिली असं भुजबळांनी म्हटलंय. 

मनोज जरांगे म्हणाले, गावागावात आंदोलन उभे करायचे, कोत्त्याची भाषा करायची आणि कोण तुला गोळी मरणार, कोण तो पोलीस सांगणार गोळी मारणार? काहीपण बोलतो. नाशिक , वाशिम, जळगाव, हिंगोलीत आम्हाला अनेक अडचणी आल्या,आम्ही सांगित्या नाहीत. आमच्या  जीवाला धोका असा रिपोर्ट पोलिसांनी का दिलं नाही? आमच्या सोबत जे घडलं ते 24 तारखेला सांगणार आहे. दौऱ्यामध्ये  काही  संशय आला होता मात्र पोलिसांनी काही सांगितल नाही. आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हते 30-30  किलोमीटर पोलीस नसायचे.

Gopichand Padalkar : चप्पलफेक हल्ल्याचा निषेर्धात आटपाडीत कडकडकीत बंद

17 डिसेंबरला आंदोलनाची दिशा  ठरेल : जरांगे

 जरांगे म्हणाले, 24 डिसेंबरला  सरकारने आरक्षण दिलं नाही तर शांततेत मात्र  मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. अजून आंदोलनाची दिशा ठरलेली नाही, 17 तारखेला जी दिशा  ठरेल तसे आंदोलन होईल, असे आंदोलन होईल.  अजून आंदोलन कसे असणार हे ठरलेले नाही, ती समाजाची भावना असू शकते.  सविस्तर चर्चा होईल नेमकं आंदोलन कसे करायचे? आम्ही 24 तारखेनंतर ही बैठक घेणार होती.  त्यामुळे नाईलाजास्तव 17 तारखेला बैठक घ्यावी लागत आहे. आमची फसवणूक झाली, गुन्हे मागे घेतले नाहीत. लेखी दिले नाही, त्याच्या सांगण्यावरून  सरकार काम करतो गप्पा मारत नाही. पूर्वीच मराठा आता राहिला नाही. शांततेत आता आंदोलन करेल कुठल्याही नेत्याला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply