Maratha Reservation : आता गावागावात ठिय्या, मराठा आरक्षणासाठी परभणीत आंदाेलनास प्रारंभ

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परभणी जिल्ह्यात आजपासून (शुक्रवार) सकल मराठा समाजाने गाव तिथे साखळी धरणे आंदाेलनास परभणी शहरातून प्रारंभ केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व गावात होणाऱ्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आला.

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सत्तावीस ऑक्टोबरपासून मराठा समाजाच्या वतीने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी साखळी धरणे सुरू केली आहेत. या आंदोलनात एक डिसेंबरपासून वाढ करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले हाेते.

Pune Bangalore National Highway Traffic Update : पडळकरांसह हजाराे धनगरांनी राेखला पुणे-बंगळूर महामार्ग, वाहतूक ठप्प

त्यानूसार आपासून गाव तिथे साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परभणीत वाढीव साखळी धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व गावात होणाऱ्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply