Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील किरकटवाडी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

किरकटवाडी: आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला पाठींबा म्हणून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत किरकटवाडी, जयप्रकाश नारायण नगर, शिवनगर व कोल्हेवाडी येथील व्यावसायिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला.

आंदोलनाच्या पूर्वसंध्येला किरकटवाडी गावातून किरकटवाडी फाट्यापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मशाल मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, विद्यार्थी व सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी व मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिकांसह इतर समाजातील नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Maratha Andolan : आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न; मराठा आमदारांची पोलिसांकडून धरपकड

आज सकाळपासून किरकटवाडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवले, मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर करुन घेण्यात आला, आता आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा कधीच मिळणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी बोलताना नागरिकांनी व्यक्त केल्या.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार यापुढेही वेगवेगळ्या शांततापूर्ण मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. जरांगे पाटलांची मुलाखत ऐकताना डोळ्यांत पाणी! उपोषणादरम्यान लाऊड स्पीकरवर मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत लावण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी आजपर्यंत केलेला संघर्ष व अनुभव सांगत असताना उपोषणासाठी बसलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सर्व नागरिक भावूक होऊन जरांगे पाटलांची मुलाखत ऐकत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply