Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं ठिकाण बदललं; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत मोठी अपडेट समोर आलीय. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं ठिकाण बदललं आहे. आपलं अंतरवाली सराटीमध्ये मनात लागत नसल्याचं म्हणत त्यांनी उपोषणाचं ठिकाण बदललं आहे. जरांगे पाटील आधी उपोषण सुरू करण्याची तारीख बदलली आता ठिकाण बदललं आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, हे जाणून घेऊ.

मनोज जरांगे पाटील यांना अंतरावली सराटीमध्ये उद्या ४ जूनला करण्यात येणारे आमरण उपोषण ८ तारखेला करणार असल्याचं सांगितलं. आचार संहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात अजून एक मोठी अपडेट समोर आलीय. जरांगे पाटील हे अंतरावली सराटी येथे उपोषण करणारच नसल्याचं म्हटलंय. अंतरावली सराटी येथे आपलं मन लागत नसल्याचं ते म्हणाले.

Jalgaon News : काम नसल्याने बेरोजगार तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

अंतरावली सराटी हे गाव खूप चांगलं आहे,परंतु आंदोलनामुळे गावाला आणि गावकऱ्यांना त्रास होईल, यामुळे आपण तेथे आता उपोषण करणार नसल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी फेसबूक पोस्ट करत दिलीय. गाव चांगले आहे, गाव अडचणीत येऊ नये,ही आपली भूमिका आहे, त्यामुळे त्या गावात आमरण उपोषण आंदोलन करण्यासाठी आपलं मत लागत नाहीये. आता उपोषण आंदोलन कुठे करावे हे समाज बांधवांशी बोलून ठरवलं जाईल, अशी माहितीही जरांगे पाटील यांनी दिली.

आंदोलन होऊ न देण्यासाठी आणि समाजाचं भलं होऊ न देण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. ज्याला मराठा समाजाचे भले करू द्यायचे नाही तो स्वत:ची वाहन फोडेल. तोडफोड करेल. मग सरकार पुन्हा एकदा षडयंत्र करेल आणि पुन्हा त्या गावातील गावकऱ्यांवर लाठीचार्ज करेल. गावाला कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आणलं जाईल.

कोणी एखादा काहीतरी बोलेल मग त्याला कोणी बोललं की, हिंसाचार केला जाईल, त्या व्यक्तीला सरकारचा पाठिंबा असेल. त्याच्या पाठीमागून सरकार गावकऱ्यांना वेठीस धरेल, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. सरकारवरही आरोप करताना त्यांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply