Maratha Reservation : नाकातून रक्त, पोटात तीव्र वेदना; मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली

Maratha Reservation : राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावत चालली आहे. आज त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. पोटामध्ये तीव्र वेदना होत असूनही मनोज जरांगे उपचार घेण्यास नकार देत आहेत.

आमरण उपोषणच्या सहाव्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली आहे. पोटात वेदना होत असल्याने त्यांनी पोटाला दाबून धरले आहे. जरांगेंनी उपचार घ्यावेत यासाठी सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपचार घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.

Pune Crime : पुण्यात उच्च शिक्षित तरुणांकडून गांजा विक्री; २७ किलो अमली पदार्थांसह ३ तरुणांना अटक

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळ गावी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. "मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर आधी अंमलबजावणी कधी करणार ते सांगा?", असा सवाल जरांगेंनी सरकारला केला आहे.

मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला तसेच शासनाच्या दारात नेऊन टाका, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी काल उपस्थित सर्व मराठा बांधवांना साद घातली आहे.

काल जरंगेंची परवानगी नसताना त्यांच्यावर IV उपचार करण्यात आले. मात्र त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हाताला लावलेली सलाइन देखील स्वत: काढून टाकली. तातडीने अंमलबजावणी न झाल्यास मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याचा इशारा दिला आहे.

जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस सरकारकडून अद्याप झालेली नाहीये. सोबतच मराठा आरक्षण मागणीबाबतही सरकार कुठलीही स्पष्ट भूमिका करत नाहीये. त्यामुळे अंतरवाली सराटीत आलेल्या महिला आक्रमक झाल्या आहेत. आम्ही मुंबईला जातो आणि सरकारला साडी चोळीचा आहेर देतो, असा निश्चय अंतरवालीत जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या महिलांनी बोलून दाखवलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply