Maratha Andolan : मराठा आंदोलक तिसऱ्या दिवशीही आक्रमक; अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन, एसटीसेवा बंद, नागरिकांचा खोळंबा

Maratha Andolan : मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आलेल्या अध्यादेशावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागणी मान्य होत नसल्याने राज्यभर अनेक जिल्ह्यांत मराठा बांधव आक्रमक झालेत. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

St Service Closed : नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा बंद; ८० लाखाचे नुकसान

लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने सलग तिसऱ्या दिवशी देखील चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान माजी आमदार दिनकर माने यांची गाडी मराठा तरुणांनी अडवली. संतप्त मराठा तरुणांनी गाडीच्या समोर झोपत निषेध व्यक्त केला आहे. तसेच लातूर-सोलापूर महामार्ग मराठा तरुणांनी अडवला आहे. यावेळी त्यांनी गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिकेला रस्ता दिला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply