Maratha Andolan: फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Maratha Andolan : जालना येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, मुंबईतील दादर येथे उद्या, रविवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.

जालना येथील घटनेचा निषेध केला जाईल. जोपर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्याच्या आंदोलनानंतर मुंबईत विभागवार आंदोलने केली जातील. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत शांततेत आंदोलन करत होतो. आम्हाला पकडून घरात घुसून मारलं. आता जशास तसं उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.

Maratha Andolan : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, सरपंचानी स्वतःचीच कार पेटून केला निषेध;

बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

दरम्यान, 2018 नंतर पुन्हा एकदा बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. काल घडलेल्या सराटे आंतरवाली येथील घटनेनंतर, आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. आता परळी मधून बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

परळी शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply