Maratha Andolan : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, सरपंचानी स्वतःचीच कार पेटून केला निषेध;

Maratha Andolan: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनामध्ये पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेचे तीव्र पडसाद संभाजीनगर शहरांमध्ये दिसायला लागले. त्यातच फुलंब्री तालुक्यातील एका सरपंचाने संभाजीनगर जळगाव महामार्गावर फुलंब्रीमध्ये रस्ता अडवून स्वतःची कार पेटवून रास्ता रोको केला आणि या घटनेचा तीव्र निषेध केला. मंगेश साबळे, असं या सरपंचाचे नाव आहे.

Raj Thackeray : इथे सरकारचं चुकलं, जालन्यातील घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; सरकारवर हल्लाबोल

अकोल्यात वंचित बहुजन आघाडी कडून जालन्याच्या घटनेच्या विरोधात पुतळा दहन

दरम्यान, जालन्यातील घटनेच्या विरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्यवर्धन पुंडकर यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा

अहमदनगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

धुळे-सोलापूर महामार्गावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

धुळे-सोलापूर महामार्गावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा हवेत गोळीबार केला. शहागडजवळ मराठा आंदोलकांनी रोखून धरला होता. महामार्ग आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करून महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply