Maratha Aarkshan : सांगली जिल्हा बंदची हाक; जालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचा निर्णय

सांगली : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जालना येथे आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आता सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाने हा निर्णय घेत ७ सप्टेंबरला संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

सांगलीमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आज जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक झाली. यात ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या मोर्चापूर्वी ७ सप्टेंबरला सांगली जिल्हा बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. जिल्हा बंद पाळण्यात येणार असल्याने ११ सप्टेंबरचा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

Aarey Colony Ganpati Visarjan : आरे कॉलनीतील ६ हजार विघ्नहर्त्याच्या विसर्जनावर येणार विघ्न? प्रशासनाच्या निर्णयाला रवींद्र वायकरांचा विरोध

पुणे-बंगळूर महामार्गही रोखणार 

सांगली जिल्हा बंदची हाक मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली आहे. गावागावात कडकडीत बंद पाळून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातून जाणारे सर्व राज्यमार्ग त्याचबरोबर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर देखील रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply