Maratha Aarakshan : ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा चौथा बळी; चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

Maratha Aarakshan : मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काहीअंशी थंडावला. मात्र अद्याप तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे.

यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केलीये. आत्महत्ये आधी तरुणाने राज्य सरकारच्या निषेधार्थ एक चिठ्ठी लिहून ठेवलील्याची माहिती मिळाली आहे. ऐन दिवाळीत तरुणाच्या आत्महत्येने गावात दु:खाचं वातावरण पसरलं आहे.

Nandurbar Crime News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री युवकाचा खून, नंदुरबारच्या अमृत चौकात पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त

नांदेड तालुक्यातील मरळक येथील दाजीबा रामदास कदम (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो चौथा बळी ठरला आहे. नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. विष घेतल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला होता.

त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

मुजोर प्रशासनाला असे कीती बळी हवेत? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply