Maratha Aarakshan : कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच, मनोज जरांगे मागण्यांवर ठाम; नितेश राणेंनाही सल्ला

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हिंगोलीच्या कुरुंदा गावात यलगार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे मोठी गर्दी या सभेला होण्याची शक्यता वर्ववली जात आहे.

त्याआधी कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, केंद्राने घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच असतात. 

मर्यादा वाढवायची असेल तर तो केंद्राचा विषय असतो. आता काय करायचं ते राज्य सरकारने ठरवावे. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं, यावर आम्ही ठाम आहोत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

Railway Mega Block : पुणे-दौंड मार्गावर विशेष ब्लॉक; पुढील दोन दिवस अनेक रेल्वेगाड्या रद्द

आमच्यावर टीका करू नये, नितेश राणे यांना सल्ला

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं, दुसऱ्यांवर टीका करू नये, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ते बोलले म्हणून आम्ही बोलतो. त्यांनी डिवचलं म्हणून मी बोललो. टीका करू नये, टार्गेट करु नये आम्ही शांत बसतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. पण मी त्यांना आवाहन केलं, साथ द्या. आमच्या मराठा राजकीय नेत्यांना देखील आम्ही गृहित धरत नाही. आमच्या मराठा नेत्यांना त्यांना मोठं करण्यासाठी आम्ही लागतो. पण आमच्यासाठी ते नाहीत.आम्हाला त्यांची गरज पण नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply