Mantralaya News : मंत्रालयात खळबळ, बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानंतर उडाला गोंधळ

Mumbai : मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याबाबतचा धमकीचा फोन आला आहे. या धमकीच्या फोननंतर मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून मंत्रालय परिसर आणि इमारतीमध्ये तपासणी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुन्हा मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. या फोननंतर मंत्रालयच्या बाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. डॉग स्क्वॅयड आणि बॉम्ब शोध पथक मंत्रालय परिसरात तपासणी करत आहेत. मंत्रालयात येणाऱ्या गाड्यांची सखोल तपासणी केली जात आहे.

Rahul Gandhi On Gautam Adani: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि त्याच्या ठिकाणाची माहिती देखील समोर आली आहे. बाळकृष्ण ढाकणे असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. या धमकीच्या फोननंतर मंत्रालयाच्या संपूर्ण परिसराची आणि इमारतीची तपासणी करण्यात आली पण बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांची खात्री केली. कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply