Manoj Jarange Patil News : जालन्यातील सभेत १४८ जेसीबी असणार, हे शक्तीप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून सडकून टीकाही होत आहे. मराठा समाजाच्या गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे जेबीसीने फुलं टाकून स्वागत केलं जातं, शेकडो एकरवर सभा घेतली जाते यावर आक्षेप घेतला जातो. त्याबाबत मनोज जरांगेंना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “नाही दादा, हे शक्तीप्रदर्शन नाही. गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी ६०-७० वर्षे आरक्षणाची वाट बघितली. इतकी वर्षे लढून मराठा समाजा आशा मावळल्या होत्या. आता कुठंतरी महाराष्ट्रात ३२ लाख लोकांना आज आरक्षण मिळालं आहे. सातत्याने कुणबी नोंदी सापडत आहेत आणि हे आरक्षण मिळणं चालूच आहे. त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी आहे. घराघरातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचं  कल्याण होत आहे.”

Ahmednagar News : दूध आणि ऊस दरासाठी रास्ता रोको; नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेवासा- श्रीरामपूर महामार्ग अडवला

“जेसीबीने फुलं टाकून स्वागत करण्यात काहीही वावगं नाही”

“मीही समाजालाच मायबाप मानलं आहे. त्यामुळे मीही समाजाचं लेकरू आहे. त्यामुळे समाजात उत्साह आहे आणि त्यातूनच ते स्वागत करत आहेत. त्यात काहीही वावगं नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

“ज्या जेसीबीवरून तुमच्यावर सातत्याने टीका तो टाळत का नाही?”

“ज्या जेसीबीवरून तुमच्यावर सातत्याने टीका तो टाळत का नाही?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “मी स्वागतासाठी जेसीबी वापरू नका असं सांगतो आहे. मात्र, तो समाजाचा आनंद आहे. ३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच भावनेतून ते जेसीबीने स्वागत करत आहेत.”

“मी माझा शब्द मागे घेतो”, भुजबळांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची माघार; म्हणाले, “आम्ही आमच्या ध्येयावरून…”

“त्यामुळे त्याच्यावर लोक कसे फुलं टाकतील?”

“मीही फुलं, हार घ्यायला नको म्हणतोय. मात्र, टीका करणाऱ्यांवर कुणी फुलं, हार टाकतच नाही त्याला आम्ही काय करावं. टीका करणाऱ्यांची कितीही जळजळ झाली, तर आमचा समाज एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळे समाज जीव लावत आहे. ते इतरांच्या लेकरांसाठी लढतच नाहीत, त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लढतात. त्यामुळे त्याच्यावर लोक कसे फुलं टाकतील?”, असा सवाल करत त्यांनी टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply