Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरूवात!

Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन रान पेटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटलांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या सभेने या दौऱ्याला सुरूवात होईल.

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. जरांगे पाटील हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातील जगदाळे मामा हायस्कूल च्या मैदानावर सकाळी ११.३० होईल.

Maratha Reservation : 101 एकरवर जंगी सभा.. ५ हजार स्वयंसेवक, मनोज जरांगे पाटील इगतपुरीतून करणार आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

तसेच दुपारी २ वाजता भुम तालुक्यातील ईट या गावात जरांगे पाटील सभा घेणार आहेत. दुपारी ४.३० वाजता परंडा शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील मैदानावर भव्य सभेत ते मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी केली आहे.

इगतपुरीमध्ये विराट सभेचे आयोजन..

2 नोव्हेंबर रोजी इगतपुरी तालुक्यातील शनीतफाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०१ एकरवर ही सभा होणार असून ७० एकरवर पार्किंरची सोय करण्यात आली आहे. तर ५ हजार स्वयंसेवकाची फौज तैनात राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम..

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालण्यातील अंतरवालीत आमरण उपोषण छेडल होतं. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेत २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply